Posts

आकाशातील खरे नायक*

काव्य बहर भंडारा साहित्य मंच आयोजित उपक्रम  *आकाशातील खरे नायक*    आकाशाच्या अथांग नभात तिरंगा घेऊन उंचउंच भरारी    देशासाठी लावे प्राण पणाला हीच शूरवीरांची गाथा न्यारी.१     वादळ हो आली संकट आले तरी न डगमगली त्यांची छाती    भारत भूमीच्याच रक्षणासाठी शौर्य धैर्याची ती पेटली ज्योती.२       काळ्या मेघांना मागे सारून विमान झेप घेतली हो नभात     देशप्रेम राष्ट्रहिताचा मंत्र जपत वीर उभे राहती रे रणांगणात.३     नभाच्या उंच उंच शिखरावरती राष्ट्रतिरंगा अभिमानाने डोलतो     या वीरांच्या बलिदाना त्यागाने  अपुला भारत सुरक्षित राहतो.४      हे केवळ वैमानिकच नाहीत हे भारतमातेचे शूरवीर सपूत      आकाशातीलच खरे नायक तिरंगा सदा उंच फडकवित.५ प्रा सुरेखा कटारिया,चिंचवड पुणे ✍️

युवाचार्य परमपूज्य महेंद्र ऋषीजी महाराज साहेब अवतरण दिन -विशेष काव्य*

*युवाचार्य परमपूज्य महेंद्र ऋषीजी महाराज साहेब  अवतरण दिन -विशेष काव्य* *त्यागमय जीवनाची गाथा*    साधनेन तेजोमय दीप उजळला संयमाने जीवन झाहले पावन      ऋषीपरंपरेने धर्ममार्ग  फुलला  करुण्य धारेने शीतल झाले मन.१     सुख-वैभवाचा त्याग करून  बालमुनी पंचमहा व्रत धारी    अहिंसा, सत्य, अपरिग्रहाचा  भ.महावीरांचा संदेश जारी.२      वाणी मधुर अंतरी करुणा सदैव संयमावर राहे स्थिर      जीवमात्रावर प्रेम करे दया हे खरे जिनशासनाचे वीर.३      आगम ज्योत सदा पेटवून  अज्ञानाचा अंधकार हरला     धर्मसंस्कारांच्या सुवासाने  जनमनाचा दीप उजळला.४     त्यागमय जीवना आपुले असे आम्हा सर्वांना प्रेरणा     युवाचार्यच्या हो जन्मदिनी  चरणी शतशः नमन-वंदना.५     अवतरण दिन मंगल क्षणी  एकच मनोभाव तो दाटतो     आपुल्या त्यागाच्या तेजाने  जीवनमार्ग आमुचा उजळतो.६     दीर्घायुष्य साधना घडत राहो आपल्या चरणी मम पामरास    ...

अशी असावी सांज साजरी*

काव्यबहर साहित्य मंच भंडार * अशी असावी सांज साजरी*       दिवसभराच्या धावपळीला क्षणभर तरी द्यावी विश्रांती     आपुलकीच्या चार शब्दांनी जुळवावी एकमेकांची नाती.१      मावळत्या सोनेरी किरणानी मोहक रंगे ती नभाची लाली      धुंद निशिगंधाच्या गंधामध्ये दरवळावी सांयकाळ निराळी.२      चहाच्या कपात गप्पा रंगाव्या  आठवातील साठवणीची लकेर      आप्त जणांच्या या सहवासाने मन व्हावे आनंदाने भावविभोर.३       राग द्वेष रुसवे-फुगवे सारून नेहमीच प्रेमाची धरावी ती वाट       दुःख विसरून  सारे संयमाने हसत खुलवा जीवनाची पहाट.४     नको रे संपत्ती नको ती प्रसिद्धी नको मनाला मोठेपणाची हाव      माणुसकीच्या प्रेमळ स्पर्शानेच सुखी व्हाव प्रत्येकाचं जीवनगाव.५     हातातहात ओठांवर स्मित हास्य डोळ्यांत प्रेमाची आस दिसावी    जीवनाच्या प्रत्येक मावळतीला अशीच एक सुंदर सांज  असावी.६ प्रा सुरेखा कटारिया चिंचवड पुणे✒️

म्हणीवर आधारित काव्य- *अपमानाची पोळी सर्वांग जाळी*

काव्य बहर साहित्य मंच भंडार आयोजित  म्हणीवर आधारित काव्य- *अपमानाची पोळी सर्वांग जाळी* अपमानाची पोळी सर्वांगी जाळी मनाच्या कोपऱ्या वेदना साठली १ शब्दांचे बाण जे हृदयात घुसती त्याच्या जखमा मनामध्ये राहती.२ गोड बोलावे कुणाला न दुखवावे माणुसकीचा दीप सदा तेवत ठेवे.३ क्षणिक रागाने नाती न तोडावी क्षमेची फुले मनामध्ये फुलवावी.४ मान दिला तर मान मिळतो जगती आनंदाने बहरे माणसाची नाती.५ अपमान करून  मोठे होत नाही  अबोला पकडून काही साधत नाही.६ शब्द सदा जपून वापरावे ते शस्त्र योग्य ठिकाणी,वेळी काढा अस्त्र.७ प्रा सुरेखा कटारिया- चिंचवड पुणे✒️

निसर्गकाव्य — हिरवं हिरवं जंगल*

*काव्यबहर साहित्य मंच भंडारा शनिवार उपक्रम* *निसर्गकाव्य — हिरवं हिरवं जंगल*      हिरवंगार हिरवं जंगल चला झाडाच्या सावलीत    तणामनास करते मंगल  जणू माऊलीच्या मायेत .१    वृक्षराजी छान डोलती वाऱ्यावरती हो अलगद     हर्ष विभोर  गीत गाती कोकिळेचा घुमतो नाद.२     फुलाफुलांत रंग भरती दरवळे सुगंध चोहीकडे     ओढ्याचे निर्मळ पाणी खळखळते उताराकडे.३     हरिणांची ती धावपळ मोर पिसारा फुलवतात    निसर्गची ही सुंदर शाळा जगवते सुंदर हसवत.४     हिरवंगार हिरवं जंगल धरतीमातेचे सुंदर लेणे     झाडे वाचवू झाडे जपू निरोगी जगण्या गाऊ गाणे.५ प्रा सुरेखा कटारिया -चिंचवड पुणे✒️

मूषक वाहन गणपतीचे*

*काव्यबहर साहित्य मंच भंडारा आयोजित उपक्रम* *मूषक वाहन गणपतीचे*     मूषक वाहन गणपतीचे अर्थ तयाचा असे मोठा     लहान रूप मोठा संदेश आनंदाला नसे हो तोटा.१    चंचल मन  मूषकासम सदोदित धावत राहते    इच्छापूर्तीच्या करण्या क्षणो क्षणी ते जागते.२     मनावर लगाम बुद्धीचा  ठेवावे सदैवच नियंत्रण     विवेकसंयम सद्विचारां करा जीवन जनभावन.३     लोभ मोह अन् अहंकार मनाचीच करिती चोरी      गणराया चरणी ठेवुनी  विकारांवर मात खरी .४    विशाल रूप गणरायाचे मूषक छोटासा पायाशी      मोठेपण आकारात नसे नम्र रहा अंतःकरणाशी.५     शक्तीपेक्षा भक्ती मोठी ठेव सेवाभाव अन् श्रद्धा      मूषक देतो संदेश सुंदर नम्रता ठेवा सदा सर्वदा.६    गणराया तुझ्या चरणी मनातील चंचलता ठेवू   बुद्धीविवेक जागृत करू सद्मार्गाने जीवन जगवू.७ प्रा सुरेखा कटारिया चिंचवड पुणे✒️

संत श्री गजानन महाराज समाधी निमित्त विशेष उपक्रम शेगावीचा राणा*श्री गजानन महाराज

*संत श्री गजानन महाराज समाधी निमित्त विशेष उपक्रम शेगावीचा राणा* श्री गजानन महाराज शेगावच्या पावन भूमीत अवतरला शेगाव राणा भक्तांच्या हृदयामध्येच वसे श्री गजानन राणा. १ नाही मोह, नाही माया साधेपणाचा  सदा घाट  नामस्मरणाच्या गजराने पावन झाली सारी वाट. २ दीन-दुःखी शरण  येती त्यांना दिला हो आधार  कृपादृष्टी पडता क्षणी दूर होतो दुःखचा भार .३ गण गण गणात बोते मंत्र घुमे दाहीही दिशा  महाराज चरणी मिळे मनाला शांतीची आशा ४ संकट आले जीवनात  नाम तुझे ओठी यावे  अंधारलेल्या वाटेवरती कृपेचे दीप उजळावे . ५ प्रा सुरेखा कटारिया चिंचवड पुणे✍️

निसर्ग काव्य डोंगर दर्या

*काव्य बहर साहित्य मंच भंडारा आयोजित शनिवारचा उपक्रम- निसर्ग काव्य* विषय- डोंगरदऱ्या डोंगरदऱ्यांच्या हो उरी हिरवी चादर पसरली धुक्याच्या पडद्याआड निसर्ग दुनिया लपली. १ उंच उंच रे पर्वतरांगा आभाळा जणू भिडती दऱ्यात झुळझुळ वाहे निर्झर गोड गाणी गाती. २ कड्यावरी झुलत्या वेली पाखरे गाती मधुर गाणी वाऱ्याच्या मंद झुळुकीत दरवळे सुगंधाची राणी . ३ सूर्याची सोनेरी उधळण शिखरांवरी रंग उधळते सांजेच्या त्या कातर वेळी   लालिमा अलगद उतरते. ४ डोंगरदऱ्या खुणवती जना  क्षणभर थांब,निसर्ग पाहा धावपळीच्या  जीवनात मनाची शांती शोधत राहा. ५ प्रा सुरेखा कटारिया चिंचवड पुणे✍️

. धो महानोर. *काळ्या तांबड्या मातीचा*

काव्यबहार साहित्य मंच भंडारा आजचा उपक्रम ना. धो महानोर.   *काळ्या तांबड्या मातीचा* काळ्या तांबड्या मातीचा दरवळतो गंध सदा न्यारा कुशीत रुजे एकेंद्री जीव तिच्याने फुले संसार सारा. १ काळ्यामातीच्या कुशीत घामाच्या त्या थेंबांमध्ये उगवती हिरवीकंच स्वप्ने सुख घामाच्या गंधामध्ये. २ तांबड्या भू  कणाकणात शौर्याचीच ज्वाला दिसते या भूमीच्या रक्षणासाठी वीर  धारातीर्थी हो पडते. ३ नांगर धरत बा शेतकरी भुईशी नातं  जोपासतो  स्वतः उन्हातानात राहून जगास अन्न तो पिकवतो. ४ ऊन असो  पाऊसधारा कष्ट कधीच ना थांबती मातीच्याच कणासाठी सदा स्वप्ने उरी जागवती. ५ पहिला पाऊस बरसता माती सुगंधीत हो होते आईच्या मायेप्रमाणे तो जना मनाला कवेत घेते. ६ ही भू केवळ माती नाही ही अस्मिता असे राष्ट्राची काळ्यातांबड्या मातीत योजना दडली विकासाची . ७ प्रा. सुरेखा कटारिया चिंचवड पुणे ✍️

काव्यबहार साहित्य मंच*अतूट नात्याचे बंध -रक्षाबंधन*

काव्यबहार साहित्य मंच *अतूट नात्याचे बंध -रक्षाबंधन* जन्मोजन्मीच्या नात्याला    सदा लाभो मम् स्नेहधागा भाऊ बहिणीच्या प्रेमातील     अनमोल क्षण  छान जगा.१ बालपणीच्या त्या आठवणी     अजुनी मनामध्ये दरवळती भांडण रुसवे  हसरे ते क्षण     आठवणी साठवणी खुलती.२ कधी चिडवणे अन् हसवणे     कधी लपवीतो गोड रहस्य दुःखामध्ये सदा हाती हाता    हे नात्याचे असे खरे सौख्य .३ बहिणीच्या कोमल हातांनी    राखी मनगटी बांधली जाते स्नेह आपुलकी विश्वासाची   गाठ आनंदे प्रेम गीत गाते. ४ राखी केवळ धागा नव्हे रे   भाव भावनांचा सुंदर झरा संकटकाळी बहिण भावाचे   प्रेम  विश्वासाने सदा स्मरा. ५ प्रा सुरेखा कटारिया, चिंचवड पुणे✍️
काव्यबहर साहित्य मंच  उपक्रम चित्रावरून काव्य *पुस्तक सरले दूरध्वनी उरले* पुस्तक पानांनं ज्ञानदीप पेटतो  वाचन संस्कारां माणूस घडतो. १ डॉक्टर शिक्षक वकील किती  विविध क्षेत्रांना मिळाली गती. २ विचारांचे मोतीच  वेचत गेलो पुस्तकाच्या सवे रमता  झालो. ३  हळूचच हाती दूरध्वनी आले बोटांच्या स्पर्शी विश्व साकारले. ४ पुस्तक सरे चित्रवाणी आली वाचनाची नवी वाट गवसली. ५ पण निरर्थक दृश्य गर्दी झाली क्षणाक्षणा मम् सवय लागली. ६ नयन थकलेले मन अस्वस्थ हातात दूरध्वनी मन परास्थ . ७ पुन्हा एकदा पुस्तकांकडे वळू पुस्तकात स्वतःचे जगणे चाळू. ८ तंत्रज्ञान हवे पण विवेक हवा दूरध्वनीचा गुलाम नाही व्हावा. ९ पडद्यासह पुस्तक मैत्री जपावी ज्ञानवाटेत वाचन दीपसवे जगवी. १० प्रा सुरेखा कटारिया चिंचवड पुणे✍️

काव्यबहर साहित्य मंच आयोजित उपक्रम प्रेम काव्यऋतू प्रेमाचा

काव्यबहर साहित्य मंच आयोजित उपक्रम प्रेम काव्य ऋतू प्रेमाचा    प्रेमाला ऋतू नसतो  सदा होते गंधित सारे   हळु भावनांच्या लहरी फुलवी स्वप्नांचे तारे.१    मनी मानसी चाहूल मनातच गंध दाटला    भावना उचंबळ येता स्नेह अलगद आला. २      चांदण्या वाटेवरती सोबत तुझी  मिळावी     हाती हात देऊन या प्रेमाच्या जावे गावी.३     पावसाच्या सरींसवे  आठवणीं त्या झरती    सहवासाच्या क्षणांनी मनात कळ्या फुलती.४    ना अपेक्षा चंद्रताऱ्यांची ना दागिन्यांचा सोस   मनाला मनाची ओढ  समर्पित तो सहवास.५    ऋतू दिवस सरती ना बदले  प्रेमभाव    कोणी काहीही सांगो तोच असे प्रेम भाव. ६     ऋतूच  नसे प्रेमाला  दरवळे मनात गंध    तू असे सोबत माझ्या सदा बांधते प्रेमा बंध. ७ प्रा सुरेखा कटारिया चिंचवड पुणे✍️

*काव्य बहर साहित्य मंच आयोजित उपक्रम*माझिया माहेरा जा काव्यप्रकार- सप्तक्षरी

*काव्य बहर साहित्य मंच आयोजित उपक्रम* माझिया माहेरा जा काव्यप्रकार- सप्ताक्षरी     माझ्या मनपाखरा माहेरा जा माझिया        घेऊनी तू आसरा आठवणींचा माझ्या. १    बालपणाच्या क्षणां लागे मायेचा रंग      साठे मनात सारे आठवणीत दंग.२     बाबांच्या सावलीत क्षण असती न्यारे     आईच्या कुशीतच मन  मोकळे  करे. २    दुःखाचे सारे ओझे ती पाशी सोपवावे      अंगणात तुळस   गंधे दरवळावे. ३      मम् पाऊलखुणां  माय सदा जपती     भिंतीवरच्या स्मृती  हळू मज बोलती. ४      भावंडांच्या गंमती आठवे पुन्हा पुन्हा     हसू असू डोळ्यांत  न कळे काय गुन्हा. ५       चुलीवरचा  वास आई हातची भाजी     जुन्या त्याआठवणी  मनाला करे ताजी. ६      माझिया माहेरा जा सांग आईच्या कानी     माते तुझ्या वात्सल्यी गाते आनंद गाणी. ७ प्रा. सुरेखा कटारिया चिंचवड पुणे

जाईन विचारत रानफुला

काव्यबहर साहित्य मंच जाईन विचारत रानफुला जाईन विचारत रानफुला कुठून आणतो सुगंध  छान?  काट्यांच्या याच वाटांवरती  डोलताना हरवतोस भान?. १ नसे रे तुझी मखमली बाग नसे कुणाचाच खास सहारा उन्हातही हसत राहतोस सांगे दुःखा तुम्ही सदा विसरा. २ झुळ झुळ झुळ वाऱ्या सोबत डोलत असतो स्वच्छंदपणे दवबिंदूंच्या मोत्यांनाही जणू समजतोस तू दाग दागिने. ३ नसे तुला अपेक्षा कौतुकाची रानफुला मानाची ना आस तुला रानफुला  म्हणुनी सुंदर वाटतो तुझा निरागस भाव जगाला४ जाईन विचारत रानफुला जीवनाचे गमक सांग मला सुखदुःखात कसे जगावे मंत्र शिकव जन मानसाला. ५ फुलता फुलता सांगून जातो जगताना  सुगंध देत रहावा क्षणभंगुर या आयुष्यामध्ये इतरांसाठी आनंद ही ध्यावा. ६ प्रा सुरेखा कटारिया चिंचवड पुणे

विषय- सोड हा रुसवाकाव्यप्रकार -अष्टाक्षरी

काव्य बहर साहित्य मंच, भंडारा.  आजचा उपक्रम विषय- सोड हा रुसवा काव्यप्रकार -अष्टाक्षरी सोड हा रुसवा सखे मन व्याकुळ झाले गं तुझ्या गं अबोल्या ने  मी सैरभैरा झालो गं. १   काय झाहले सांग ना दाटे का नयनी पाणी? तुझ्या विना घर सारे जणू भासती विराणी.२ तुझे रुसवे गोड ते प्रिय फुगवे वाटती तुझी ती शांत नजर मना हुरहुर देती .३ चांदण्यांनी रात्र सजे फुले गं मोगरा दारी तुझ्या शिवाय सखे गं नको ती दुनियादारी. ४ चल सोड कटू क्षणां प्रीती वीण पुन्हा ओवू हात हातात दे सखे राग रुसवे संपवू.५  प्रेम मनात जपावे अहंकारा दूर कर सोड मिटव अबोला नाते पुन्हा  दृढ कर. ६ ओठांवर हास्य फुले जग बहरून जाई जगातला मीच प्रेमी प्रेम गीत सदा गाई. ७  प्रा. सुरेखा कटारिया, चिंचवड, पुणे.✍️

विषय :- आजच्या समाजात स्त्रियांचे योगदान* स्त्रीशक्तीचे योगदान

*काव्यबहर साहित्य मंच, भंडारा.* *दिनांक :- ०४.०८.२०२६ मंगळवार *उपक्रम क्रमांक :- १३३८ (सामाजिक काव्य)* *विषय :- आजच्या समाजात स्त्रियांचे योगदान*      स्त्रीशक्तीचे योगदान जिजाऊंच्या संस्कारातून शिवबांचा इतिहास घडला सावित्रीच्या ज्ञानज्योतीने अज्ञानाचा अंधार सरला.१ घरकुलाची ती आधारवड मायेची ती अखंड सावली कष्टामधुनी फुलवी आनंद सर्वांना ती मनस्वी भावली. २ कधी शिक्षिका बनुनी ती ज्ञानामृताचा वर्षाव करी वैद्यरूप धारण करते अन जीवन रक्षणा सदा उतरी. ३ कधी शास्त्रज्ञ नभी झेपे कधी सागरतळ ती गाठते कर्तृत्वाचे पंख भरारी घेते नव्या विश्वाला ती भेटते. ४ कधी शेतात राबत असते घामामधुनी मोती पिकवी कधी उद्योगाच्या क्षेत्रामध्ये यशाची पताका फडकवी. ५ कधी सैनिक बने सीमेवर देश रक्षणाची शान ठरे प्रेम धैर्य त्याग समर्पणाने राष्ट्रप्रेमाचे गीत ती स्मरे. ६ आई बहीण सखी कन्या नात्यांची सुंदर विण ती पत्नीच्या प्रेम स्पर्शाविना ओसाड भासे  सृष्टी ती. ७ प्रा. सुरेखा कटारिया, चिंचवड पुणे ✍️

रविवार उपक्रम- आवडती कवितारंग मैत्रीचेमैत्रीचे रंग किती न्यारे

काव्य बहर साहित्य मंच भंडारा  रविवार उपक्रम- आवडती कविता रंग मैत्रीचे मैत्रीचे रंग किती न्यारे इंद्रधनू सम सुंदर सारे सुख-दुःखाच्या वाटेवर साथ देणारे सोबती खरे. १ हास्य रंग गुलाबी गोड एकमेकाभेटण्या ओढ विश्वासाचा निळा रंग जपतो नाते सदा गोड. २ हिरवागार रंग आशेचा  मैत्रीतून नवे स्वप्न फुले पिवळा रंग आनंदाचा उजळे मार्ग स्वानंदाचा. ३ लाल रंग जिव्हाळ्याचा बंध घट्ट करतो प्रेमाचा जांभळा तो समजुतीचा अर्थ उमगवे भावनांचा. ४ मैत्री  रंगांची उधळण नात्यांची सुंदर गुंफण रंग मैत्रीचे जपू या सारे मैत्री म्हणजेच समर्पण. ५ *मैत्री दिनाच्या खूप खूप शुभेच्छा*🌷🥰🌈 प्रा. सुरेखा कटारिया, चिंचवड, पुणे ✍️.

मी कुठे म्हणालो, परी मिळावी

मी कुठे म्हणालो, परी मिळावी मी कुठे म्हणालो,परी मिळावी स्वप्नांची राणी मजसी भेटावी.  फक्त सर्वांना समजून घेणारी संवेदनशील सखीच भेटावी. १ ती चंद्रमुखी जरी नसली तरी प्रत्येकाच्या मना जाणणारी मायेचाच ओलाव्याने प्रेमभरे प्रत्येकाच्याच मनात भरणारी. २ सुख-दुःखात प्रत्येकच वेळी माझ्या सोबतच उभी राहावी वादळातही जगण्यामध्ये तुझ्या विश्वासाचीच  ज्योत उजळावी.३ देईल महाल वैभव सारे मी  प्रेमदागिने झोपडीत माझ्या हो दोन जीवाचे मिलन सुंदर  सारे देतो समर्पणाचे तुझ्या. ४ मी कुठे म्हणालो,परी मिळावी हृदय जिंकणारी सखीच हवी जीवनाच्या या प्रदीर्घ वाटेवर       प्रेम वात्सल्याची बरसात हवी. ५ प्रा. सुरेखा कटारिया चिंचवड, पुणे ✍️

विषय..सोनम वांगचूक

काव्यबहर साहित्य मंच भंडारा आयोजित उपक्रम.. विषय..सोनम वांगचूक हिमालयाचा दीप : सोनम वांगचुक    हिमशिखरी कुशीत जन्मे ज्ञानसूर्य एक तो तेजस्वी    सोनम वांगचुक नाव आहे विचारधन असे ओजस्वी.१    लडाखच्या त्या भूमीमध्ये नव चैतन्याचे बी अंकुरले    शिक्षणाच्या नव्या वाटेवर विद्यार्थ्यांचे भाग्य उजळले. २      पुस्तकापुरतेच ज्ञान नको जीवनाशी सत् नाते जोडू     कृतीने  शिक्षण घेत  जावू यश शिखरावरती हो चढू. ३     बर्फस्तूपाची कल्पना देत पाण्याचा प्रश्न मिटविला    विज्ञानास जोडून मानवता उर्धगामी दिशा दाखविला. ४     पर्यावरणाचा खंदा रक्षक निसर्गा सदा सदा जपले     हिमनद्यांचे दुःख जाणून जगण्या सूत्र शिकविले. ५       सत्यासाठी उभा राहिला अन्यायाशी हो झुंज दिली     धैर्य शौर्य जिद्द चिकाटीने ज्योती प्रज्वललीत केली. ६     साधेपणाचा अलंकार लेवून कार्यातूनी ही मान मिळविला    हिमालयाचा ज्ञानदीप बनुनी भारतमातेचा गौरव वाढविला. ७  प्रा. सुरेखा कटारिय...

माझी शाळा*

काव्यबहर रविवार उपक्रम आवडती कविता.  *माझी शाळा* शाळा म्हणजे ज्ञानमंदिर संस्कारांचा सुंदर दरबार अक्षरांच्या पवित्र वाटेवर उजळतो जीवन  संसार. १ गुरुजनांच्या प्रेमळ छायेत स्वप्नांना मिळे हो नवे बळ चुका करत शिकत शिकत यशाचे मिळते सुंदर फळ.२ मैत्रिणींच्या गोड सहवासा हास्याचे सदा फुले अंगण खेळ गाणी कविता गोष्टी आनंदाचे भरते हो दालन.३ पुस्तकांच्या प्रत्येक पानात अनुभवांचा असे खजिना ज्ञान शिस्त प्रामाणिकपणा घडविते जीवनाचा दागिना. ४ शाळा म्हणजे दुसरच घर मायेची उब प्रेमाचा जागा     इथूनच सुरू होतो प्रवास उज्ज्वल भविष्याची धागा  .५ प्रा.सुरेखा कटारिया,चिंचवड, पुणे ✍️