काव्यबहार साहित्य मंच*अतूट नात्याचे बंध -रक्षाबंधन*

काव्यबहार साहित्य मंच
*अतूट नात्याचे बंध -रक्षाबंधन*

जन्मोजन्मीच्या नात्याला
   सदा लाभो मम् स्नेहधागा
भाऊ बहिणीच्या प्रेमातील
    अनमोल क्षण  छान जगा.१

बालपणीच्या त्या आठवणी
    अजुनी मनामध्ये दरवळती
भांडण रुसवे  हसरे ते क्षण 
   आठवणी साठवणी खुलती.२

कधी चिडवणे अन् हसवणे
    कधी लपवीतो गोड रहस्य
दुःखामध्ये सदा हाती हाता
   हे नात्याचे असे खरे सौख्य .३

बहिणीच्या कोमल हातांनी
   राखी मनगटी बांधली जाते
स्नेह आपुलकी विश्वासाची
  गाठ आनंदे प्रेम गीत गाते. ४

राखी केवळ धागा नव्हे रे
  भाव भावनांचा सुंदर झरा
संकटकाळी बहिण भावाचे
  प्रेम  विश्वासाने सदा स्मरा. ५

प्रा सुरेखा कटारिया, चिंचवड पुणे✍️

Popular posts from this blog

नागपंचमीचा संबंध 'नाग' ह्या सरपटणा-या नागाशी 🐍 नसून, भारतात 'नाग' हे 'टोटेम' असणारे पाच पराक्रमी नाग वंशीय राजे होवून गेले, त्यांच्याशी आहे ..!!*

चारोळीच्या गावात चारोळी क्रमाक- १८३ लोकमान्य टिळक

हातात हात पकडला पाहिजे* कविता