हातात हात पकडला पाहिजे* कविता

*हातात हात पकडला पाहिजे*
🩷🩷🩷🩷🩷🩷🩷
 *नातं कोणतंही असो*
*मतभेद कितीही असो* 
*संबध तोडण्याची भाषा*  
*मुळीच कधी करू नये*

*प्रत्येक माणूस वेगळा* 
*विचारसरणी वेगळी*
*मनुष्य जन्मा तुझी* 
*कहाणीच आगळी-वेगळी* 

*बापा सारखा मुलगा नसतो* 
*मुला सारखी सून नसते*
*नवरा आणि बायकोचे तरी*
*कुठे तेवढे पटत असते ?*

*जरी नाही पटले तरी*
*गाडी मात्र हाकायची असते*
*अबोला धरून विभक्त होऊन*
*सार गणितं चुकायचे नसते*

*काही धरायचं असतं*
*काही सोडायचं असतं*
*एखाद्या वेळेस बिनसलं म्हणून* 
*एकमेकाला सोडायचं नसतं* 
*चुकल्यावर बोलावं*
*बोलल्यावर ऐकून घ्यावं*
*एकांतात बसल्यावर*
*अंतरंगात डोकवावं*

*राग मनात ठेवला म्हणून*
*कोणाचं भलं झालं का ?*
*बिन फुलाच्या झाडा जवळ*
*पाखरूं कधी आलं का ?*
*समोरची व्यक्ती चुकली तरी* 
*प्रेम करता आलं पाहिजे* 
*झालं गेलं विसरून जाऊन* 
*गच्च मिठी मारली पाहिजे* 
,*स्वागत होईल न होईल*
*जाणं येणं चालू ठेवल पाहिजे* 
*समोरचा जरी चुकला तरी* 
*म्हणा खुशाल ठेव देवा त्याला !*
*आयुष्य खूप छोटं आहे* 
*हां हां म्हणता संपुन जाईल*
*प्रेम करायचं राहिलं म्हणून*
*शेवटी खूप पश्चात्ताप होईल* 
*लक्षात ठेवा नात्या पेक्षा*
*दुसरं काहीही मोठं नाही*
*आपलं माणूस आपल्या  जवळ*  
*या सारखी श्रीमंती नाही* 
*सर्व ,नातलगांना आणि स्नेही मित्रांना समर्पित*

Popular posts from this blog

आजचे चिंतन आभाळा एवढं मन

नाट्यछटा काय म्हणावं या मोठ्यांना...!