नागपंचमीचा संबंध 'नाग' ह्या सरपटणा-या नागाशी 🐍 नसून, भारतात 'नाग' हे 'टोटेम' असणारे पाच पराक्रमी नाग वंशीय राजे होवून गेले, त्यांच्याशी आहे ..!!*

*नागपंचमीचा संबंध 'नाग' ह्या सरपटणा-या नागाशी 🐍 नसून, भारतात 'नाग' हे 'टोटेम' असणारे पाच पराक्रमी नाग वंशीय राजे होवून गेले, त्यांच्याशी आहे ..!!* 

*●१• नागराजा - अनंत (शेष) ..* 
*●२• नागराजा - वासुकी ..*
*●३• नागराजा - तक्षक ..*  
*●४• नागराजा - कर्कोटक ..* 
*●५• नागराजा - ऐरावत ..*

*ह्या पाचही नाग वंशीय राजांची स्वतंत्र राज्ये होती ..!!* 

*ह्यामध्ये नागराजा 'अनंत' हा सर्वात मोठा ..!! जम्मू-काश्मीर मधील 'अनंतनाग' हे शहर त्यांच्या स्मृतीची साक्ष पटवून देते ..!!* 

*त्यानंतर दुसरा नागराजा 'वासुकी' होय ..!! कैलास मानसरोवर थेट पासून उत्तर प्रदेश क्षेत्राचा वासुकी प्रमुख राजा होता ..!!*

*तिसरा नागराजा 'तक्षक' .‌!! ह्यानेच जग-प्रसिद्ध 'तक्षशिला' विश्व-विद्यापीठ स्थापन केले. येथेच पुढे प्लेटो, ऍरीस्टॉटल सारखे तत्वज्ञ शिकून गेले ..!!* 

*चौथा नागराजा 'कर्कोटक'चे रावी नदीच्या शेजारील प्रदेशात राज्य होते ..!!* 

*पाचवा नागराजा 'ऐरावत' ..!! (पिंगाला) भंडारा प्रांत आजही 'पिन्गालाई एरीया' म्हणून ओळखला जातो ..!!* 

*ह्या पाचही नागराजांच्या गणराज्याच्या सीमा एकमेकांच्या राज्याला लागून होत्या ..!!* 

*हे पाच नागराजे मृत्यू पावल्या नंतर, त्यांच्या स्मृती-प्रित्यर्थ नागवंशीय लोक "नागपंचमी" दिन दरवर्षी साजरा करीत असत ..!!*

*कालांतराने यज्ञवंशियांच्या लेखणीने नागराजाचे रुपांतर जमिनिवर सरपटणा-या 🐍नागात करुन टाकले ..!!* 

*त्याचाच परिणाम म्हणून 'नाग नरसोबा' आणि काही पोथ्या प्रसिद्ध झाल्या आणि हा दिवस फक्त 'सरपटणाऱ्या 🐍 नागांची पंचमी' म्हणून ओळखला जावू लागला, आणि नागवंशीय राजे लोकांची पंचमी लुप्त झाली ..!!* 

*आज नागाला दुध पाजणे, त्याची पूजा करणे एवढाच नागपंचमीचा अर्थ उरला. बहुजन समाज आजही घराच्या भिंतीवर पाच नाग काढणे विसरलेला नाही ..!!* 

 *हे पाच नाग म्हणजेच आपले पाच नागराजे होते, ते जमिनीवर सरपटणारे सर्प नव्हेत ..!!* 

*आज जरी 'नागपंचमी' ही सरपटणाऱ्या नागाची म्हणून प्रसिध्द असली तरी, त्याबाबतची ऐतिहासिक वास्तविकता वेगळीच आहे ..!!*

Popular posts from this blog

आजचे चिंतन आभाळा एवढं मन

हातात हात पकडला पाहिजे* कविता

नाट्यछटा काय म्हणावं या मोठ्यांना...!