शक्तीची उपासना*
काव्यबहर साहित्य मंच आयोजित विशेष उपक्रम काव्यप्रकार -सप्ताक्षरी *शक्तीची उपासना* शक्तीची उपासना भक्तीची आराधना देवीच्या हो चरणी मन भाव वंदना.१ घटामध्ये ती ज्योत नऊ शक्तींचा गंध तुझ कृपेचा झोत मन पावे आनंद.२ अंतरीची शुद्धता नऊ रूपे ती तुझी तुझ्या कृपेने माते पिडा जाईहो माझी.३ शक्ती देशील माते संकटांशी लढाया भक्ती अर्पिते माते सत्कर्मे ते कराया.४ सेवेच्या वाटेवर प्रेमफुले फुलू दे माणुसकीचा दीप, घरोघरी उजळू दे.५ नको रे कर्मकांड नको केवळ पूजा सद्विचारांचा गंध विचार फक्त तुझा.६ स्त्रीशक्तीचा गौरव समतेचा संदेश अन्यायाच्या विरुद्ध न्यायाचाच आदेश.७ जय हो जगदंबे जय दुर्गा भवानी तुझ्या नामामृताने पावन होते वाणी.८ भक्तीच्या प्रकाशात ज्ञानराजा येऊ दे सद्भावात सुंदर छान जग घडू दे.९ ✍️ प्रा. सुरेखा कटारिया, चिंचवड, पुणे