म्हण _आईचा काळ बायकोचा मवाळ*

*काव्य बहर साहित्य मंच भंडारा आयोजित म्हणी आधारित काव्य लेखन उपक्रम*


*म्हण _आईचा काळ बायकोचा मवाळ*

*शीर्षक -पोरा तुझं नाव* 
*द्विपदी बाराक्षरी*

 आईचा काळ बायकोचा मवाळ
मुलगा सांभाळे बायकोचे ताल 

आईने जन्म दिला बायको संग
जन्म घालवायचा तू नीट वाग

 तुझ्यासाठी तिनं आईबा सोडले
 तुझ्या आईबाबाला तिनं मानले

भाळी  तिचं कुंकू तुझ्याच नावाचं
मंगळसूत्र परमिट लग्नाचं

हात तिचे बांगड्या तुझ्या नावच्या
पायात रे पट्ट्या तुझ्या गावच्या

बाळाच  तीच करणार पोषण
 बाळच तुझं नाव  करे रोशन

लेकाचं लेकरू चिकट भोकरू
लेकीचं लेकरू उडत पाखरू

प्रा सुरेखा कटारिया चिंचवड पुणे✒️

Popular posts from this blog

हातात हात पकडला पाहिजे* कविता

नाट्यछटा काय म्हणावं या मोठ्यांना...!

चला चारोळीच्या गावा चारोळी क्रमांक-१८८. श्रावण