कवितेचे नाव- शब्दांची संगत
रविवारचा उपक्रम आवडती कविता
कवितेचे नाव- शब्दांची संगत
सुखदुःखात कविता
करे शब्दांची संगती
शब्दात भाव ओतत
होते काव्याची निर्मीती. १
मनाच्या भाव भावना
मांडतो कवी शब्दात
नसे कसली साधना
भाव भरतो काव्यात. २
नकळ स्फुरे कविता
येई शब्दच भेटाया
शब्द कळ्यात सविता
शब्द काव्यात वाटाया. ३
कवितेच्या वेलीवर
फुटे शब्दांचे धुमारे
शब्द राज्य मनावर
हर्ष भरे जीने सारे. ४
मनाच्या आभाळी जमे
काळेभोर शब्दं ढग
वारा विचारांचा रमे
शब्दांचा पाऊस मग. ५
घेता लेखनी हो हाती
पांढऱ्याचे काळे होती
शब्दा मागे शब्द येती
जीवन गाणे हो गाती. ६
असा शब्द काव्य सार
शब्द महिमा अपार
आनंदाने जगण्यास
देते कविता आधार. ७
प्रा सुरेखा कटारिया चिंचवड पुणे✒️