काव्य बहर साहित्य मंच भंडारा* अधुरी एक कहाणी
*काव्य बहर साहित्य मंच भंडारा*
*अधुरी एक कहाणी..!*
तुझ्याच शिवाय माझी
अधुरीअसे जीवनगाथा
तुझ्या विरहानं सख्या
जगणे वाटते सदा वृथा. १
मुक्तपणे बोलत जाऊ
तु मला करतो रे वादा
ठरवू भेटण्याच्या वेळा
वेळेवर येत नाही सदा. २
वाट पाहून थकले डोळे
मन फिरे तुझ्या भोवती
आठवणींच मोहळ उठे
माझ्या रे अवतीभवती. ३
आनंदाने जगूया आपण
नको तेच रुसवे फुगवे
आपल्या दोघांच्या मध्ये
नको कोणते आगलावे. ४
सदा आपण बोलत राहू
विचारांची देवाण घेवाण
प्रेम वाढते रे सहवासाने
ठेवूया जगण्याचे भान. ५
प्रा सुरेखा कटारिया चिंचवड पुणे✒️