काव्यप्रकार- छोटा अभंग
मंगळवारचा उपक्रम सामाजिक काव्य विषय : शुभकार्यात गोंधळ उपक्रम क्र. ११७३
मंगळवार दि. :-१७/०२/२०२६
काव्यप्रकार- छोटा अभंग
शुभ कार्यात गोंधळ
अर्थ हो त्याचा प्रबळ. १
घालू गोंधळ लग्नात
मात करूया विघ्नात. २
शुभ कार्यात गोंधळ
घाली नाते नाते घोळ. ३
लग्नात हिडीस नृत्य
नको ते वागणे व्रात्य. ४
मद्यपानाने गोंधळे
हे पावित्र्याचे सोहळे?. ५
करू नेत्यांच्या जयंत्या
गुण साजरे मयंत्या. ६
शुभकार्या हर्ष भरे
होण्या शांतीस सत्वरे. ७
मनी जपावी संस्कृती
सदा सोडाया विकृती. ८
करे सु-रेखा विचार
करू साजेसा आचार.९
प्रा. सुरेखा कटारिया- चिंचवड पुणे✒️