विषयः- *वडाच्या पारंब्या*शीर्षकः- *आयुर्वेदातील ऋषीमुनी*प्रकारः-

🪷काव्यबहर साहित्य मंच,भंडारा🪷
शनिवारचा *निसर्ग काव्य* उपक्रम
      उपक्रमासाठी स्वरचित रचना
०८ नोव्हेंबर २०२५ , उपक्रम क्र.१०७५
विषयः-  *वडाच्या पारंब्या*
शीर्षकः- *आयुर्वेदातील ऋषीमुनी*
प्रकारः-  

वडाच्या पारंब्या केस 
गळी कमीच करतात
टक्कल पडण्या पूर्वी
छान केस वाढवतात.१

    वडा अंकुराचा उपयोग        
    उत्तम गर्भ वाढीसाठी 
    वड चिकाचा उपयोग 
    उष्माकमी होण्यासाठी.२

वड  सालीचा उपयोग
दात दुखी जाण्यासाठी
वड पारंब्याचा काढा
शक्तीनं रोगमुक्तीसाठी.३

  पोटी जंतास पारंब्याचे
  कोवळे अंकुर उपयुक्त
  ताकासह घेताच त्यानं
  पचनक्रिया होते सशक्त. ४

वड सातशे बारा किलो 
प्राणवायू,वाढलेले झाड
वातावरणी सोडते,निसर्ग 
गुणांची  महत्त्वाची जोड. ५

     वड जणू दाढी वाढलेला
     आयुर्वेदातील ऋषीमुनी
     प्रत्येकाने लावूयाच  वड
    याचा उपयोग जनी वनी.६

प्रा सुरेखा कटारिया-चिंचवड पुणे

Popular posts from this blog

आजचे चिंतन आभाळा एवढं मन

भगवान महावीरांच्या मार्गाने गेल्या उज्वल भविष्य डॉक्टर श्वेता राठोड

नाट्यछटा काय म्हणावं या मोठ्यांना...!