विषय:-- *तू आहेस म्हणून...*
उपक्रम. :-- *जागतिक महिला दिनानिमित्त विशेष काव्य लेखन*
विषय:-- *तू आहेस म्हणून...*
तू आहेस म्हणून
जगण्यास ऊर्जा
येते,लक्षात घे रे
माझ्या तूची सर्जा.१
संसारी वर्तुळात
तूच रेे केंद्र बिंदू
समस्या सोडविते
सदा तुला गं वंदू. २
नाही गात महिमा
फक्त नारीशक्तीचा
तू राम कृष्ण दिले
वारसा संस्काराचा.३
सखे तू उंच उंच
सदा घेते भरारी
वेळ प्रसंगी नारी
बनते हो करारी. ४
आई आजी आत्या
सखी कन्या भगिनी
निभवते अनेक नाते
तूच जीवन संगिनी. ५
गवसणी आकाशी
गुंतविते प्रेम पाशी
हीच जीवन राशी
माणसा जगवशी. ६
प्रा सुरेखा कटारिया चिंचवड पुणे✒️
महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा🌹