विषय :- महाशिवरात्री शिर्षक :- नमन
Date: 15 Feb 2026
काव्यबहर साहित्य मंच आयोजित उपक्रम
अभंग लेखन
विषय :- महाशिवरात्री
शिर्षक :- नमन
महाशिवरात्री ,करूया नमन
भजन कीर्तन, भररात्री. १
जोडोनिया कर,गाऊया आरती
शिवच्या पार्वती,जग सार्थी.२
शिवपार्वतीचे, ते सहजीवन
हो मनभावन, आदर्शाचे. ३
महादेव होती, प्रसन्न भक्तांना
हो मनोकामना, पूर्ण होती. ४
हलाहल घेता , दाह तो थांबण्या
बिल्वपत्र घेण्या, आरोग्यता. ५
होता पित्त घ्यावा,बिल्वपत्र रस
आरोग्यास खास, सवे प्यावा. ६
भक्तीच्या भावाने, सुरेखा पुजते
शंकरा भजते, आनंदाने. ७
प्रा सुरेखा कटारिया चिंचवड पुणे✒️