मी कुठे म्हणालो, परी मिळावी

मी कुठे म्हणालो, परी मिळावी

मी कुठे म्हणालो,परी मिळावी
स्वप्नांची राणी मजसी भेटावी. 
फक्त सर्वांना समजून घेणारी
संवेदनशील सखीच भेटावी. १

ती चंद्रमुखी जरी नसली तरी
प्रत्येकाच्या मना जाणणारी
मायेचाच ओलाव्याने प्रेमभरे
प्रत्येकाच्याच मनात भरणारी. २

सुख-दुःखात प्रत्येकच वेळी
माझ्या सोबतच उभी राहावी
वादळातही जगण्यामध्ये तुझ्या
विश्वासाचीच  ज्योत उजळावी.३

देईल महाल वैभव सारे मी 
प्रेमदागिने झोपडीत माझ्या
हो दोन जीवाचे मिलन सुंदर 
सारे देतो समर्पणाचे तुझ्या. ४

मी कुठे म्हणालो,परी मिळावी
हृदय जिंकणारी सखीच हवी
जीवनाच्या या प्रदीर्घ वाटेवर      
प्रेम वात्सल्याची बरसात हवी. ५

प्रा. सुरेखा कटारिया चिंचवड, पुणे ✍️

Popular posts from this blog

चारोळीच्या गावात चारोळी क्रमाक- १८३ लोकमान्य टिळक

हातात हात पकडला पाहिजे* कविता

आजचे चिंतन आभाळा एवढं मन