काव्यबहर साहित्य मंच आयोजित उपक्रम प्रेम काव्यऋतू प्रेमाचा

काव्यबहर साहित्य मंच आयोजित उपक्रम प्रेम काव्य

ऋतू प्रेमाचा

   प्रेमाला ऋतू नसतो 
सदा होते गंधित सारे
  हळु भावनांच्या लहरी
फुलवी स्वप्नांचे तारे.१

   मनी मानसी चाहूल
मनातच गंध दाटला
   भावना उचंबळ येता
स्नेह अलगद आला. २

     चांदण्या वाटेवरती
सोबत तुझी  मिळावी
    हाती हात देऊन या
प्रेमाच्या जावे गावी.३

    पावसाच्या सरींसवे 
आठवणीं त्या झरती
   सहवासाच्या क्षणांनी
मनात कळ्या फुलती.४

   ना अपेक्षा चंद्रताऱ्यांची
ना दागिन्यांचा सोस
  मनाला मनाची ओढ
 समर्पित तो सहवास.५

   ऋतू दिवस सरती
ना बदले  प्रेमभाव
   कोणी काहीही सांगो
तोच असे प्रेम भाव. ६

    ऋतूच  नसे प्रेमाला 
दरवळे मनात गंध
   तू असे सोबत माझ्या
सदा बांधते प्रेमा बंध. ७

प्रा सुरेखा कटारिया चिंचवड पुणे✍️

Popular posts from this blog

चारोळीच्या गावात चारोळी क्रमाक- १८३ लोकमान्य टिळक

हातात हात पकडला पाहिजे* कविता

आजचे चिंतन आभाळा एवढं मन