आकाशातील खरे नायक*

काव्य बहर भंडारा साहित्य मंच आयोजित उपक्रम

 *आकाशातील खरे नायक*

   आकाशाच्या अथांग नभात
तिरंगा घेऊन उंचउंच भरारी
   देशासाठी लावे प्राण पणाला
हीच शूरवीरांची गाथा न्यारी.१

    वादळ हो आली संकट आले
तरी न डगमगली त्यांची छाती
   भारत भूमीच्याच रक्षणासाठी
शौर्य धैर्याची ती पेटली ज्योती.२

      काळ्या मेघांना मागे सारून
विमान झेप घेतली हो नभात
    देशप्रेम राष्ट्रहिताचा मंत्र जपत
वीर उभे राहती रे रणांगणात.३

    नभाच्या उंच उंच शिखरावरती
राष्ट्रतिरंगा अभिमानाने डोलतो
    या वीरांच्या बलिदाना त्यागाने 
अपुला भारत सुरक्षित राहतो.४

     हे केवळ वैमानिकच नाहीत
हे भारतमातेचे शूरवीर सपूत
     आकाशातीलच खरे नायक
तिरंगा सदा उंच फडकवित.५

प्रा सुरेखा कटारिया,चिंचवड पुणे ✍️

Popular posts from this blog

नागपंचमीचा संबंध 'नाग' ह्या सरपटणा-या नागाशी 🐍 नसून, भारतात 'नाग' हे 'टोटेम' असणारे पाच पराक्रमी नाग वंशीय राजे होवून गेले, त्यांच्याशी आहे ..!!*

चारोळीच्या गावात चारोळी क्रमाक- १८३ लोकमान्य टिळक

हातात हात पकडला पाहिजे* कविता