काव्यबहर साहित्य मंच  उपक्रम चित्रावरून काव्य
*पुस्तक सरले दूरध्वनी उरले*

पुस्तक पानांनं ज्ञानदीप पेटतो 
वाचन संस्कारां माणूस घडतो. १

डॉक्टर शिक्षक वकील किती 
विविध क्षेत्रांना मिळाली गती. २

विचारांचे मोतीच  वेचत गेलो
पुस्तकाच्या सवे रमता  झालो. ३

 हळूचच हाती दूरध्वनी आले
बोटांच्या स्पर्शी विश्व साकारले. ४

पुस्तक सरे चित्रवाणी आली
वाचनाची नवी वाट गवसली. ५

पण निरर्थक दृश्य गर्दी झाली
क्षणाक्षणा मम् सवय लागली. ६

नयन थकलेले मन अस्वस्थ
हातात दूरध्वनी मन परास्थ . ७

पुन्हा एकदा पुस्तकांकडे वळू
पुस्तकात स्वतःचे जगणे चाळू. ८

तंत्रज्ञान हवे पण विवेक हवा
दूरध्वनीचा गुलाम नाही व्हावा. ९

पडद्यासह पुस्तक मैत्री जपावी
ज्ञानवाटेत वाचन दीपसवे जगवी. १०

प्रा सुरेखा कटारिया चिंचवड पुणे✍️

Popular posts from this blog

नागपंचमीचा संबंध 'नाग' ह्या सरपटणा-या नागाशी 🐍 नसून, भारतात 'नाग' हे 'टोटेम' असणारे पाच पराक्रमी नाग वंशीय राजे होवून गेले, त्यांच्याशी आहे ..!!*

चारोळीच्या गावात चारोळी क्रमाक- १८३ लोकमान्य टिळक

हातात हात पकडला पाहिजे* कविता