विषय :- आजच्या समाजात स्त्रियांचे योगदान* स्त्रीशक्तीचे योगदान
*काव्यबहर साहित्य मंच, भंडारा.*
*दिनांक :- ०४.०८.२०२६ मंगळवार
*उपक्रम क्रमांक :- १३३८ (सामाजिक काव्य)*
*विषय :- आजच्या समाजात स्त्रियांचे योगदान*
स्त्रीशक्तीचे योगदान
जिजाऊंच्या संस्कारातून
शिवबांचा इतिहास घडला
सावित्रीच्या ज्ञानज्योतीने
अज्ञानाचा अंधार सरला.१
घरकुलाची ती आधारवड
मायेची ती अखंड सावली
कष्टामधुनी फुलवी आनंद
सर्वांना ती मनस्वी भावली. २
कधी शिक्षिका बनुनी ती
ज्ञानामृताचा वर्षाव करी
वैद्यरूप धारण करते अन
जीवन रक्षणा सदा उतरी. ३
कधी शास्त्रज्ञ नभी झेपे
कधी सागरतळ ती गाठते
कर्तृत्वाचे पंख भरारी घेते
नव्या विश्वाला ती भेटते. ४
कधी शेतात राबत असते
घामामधुनी मोती पिकवी
कधी उद्योगाच्या क्षेत्रामध्ये
यशाची पताका फडकवी. ५
कधी सैनिक बने सीमेवर
देश रक्षणाची शान ठरे
प्रेम धैर्य त्याग समर्पणाने
राष्ट्रप्रेमाचे गीत ती स्मरे. ६
आई बहीण सखी कन्या
नात्यांची सुंदर विण ती
पत्नीच्या प्रेम स्पर्शाविना
ओसाड भासे सृष्टी ती. ७
प्रा. सुरेखा कटारिया, चिंचवड पुणे ✍️