निसर्ग काव्य डोंगर दर्या
*काव्य बहर साहित्य मंच भंडारा आयोजित शनिवारचा उपक्रम- निसर्ग काव्य*
विषय- डोंगरदऱ्या
डोंगरदऱ्यांच्या हो उरी
हिरवी चादर पसरली
धुक्याच्या पडद्याआड
निसर्ग दुनिया लपली. १
उंच उंच रे पर्वतरांगा
आभाळा जणू भिडती
दऱ्यात झुळझुळ वाहे
निर्झर गोड गाणी गाती. २
कड्यावरी झुलत्या वेली
पाखरे गाती मधुर गाणी
वाऱ्याच्या मंद झुळुकीत
दरवळे सुगंधाची राणी . ३
सूर्याची सोनेरी उधळण
शिखरांवरी रंग उधळते
सांजेच्या त्या कातर वेळी
लालिमा अलगद उतरते. ४
डोंगरदऱ्या खुणवती जना
क्षणभर थांब,निसर्ग पाहा
धावपळीच्या जीवनात
मनाची शांती शोधत राहा. ५
प्रा सुरेखा कटारिया चिंचवड पुणे✍️