. धो महानोर. *काळ्या तांबड्या मातीचा*

काव्यबहार साहित्य मंच भंडारा आजचा उपक्रम
ना. धो महानोर. 
 *काळ्या तांबड्या मातीचा*

काळ्या तांबड्या मातीचा
दरवळतो गंध सदा न्यारा
कुशीत रुजे एकेंद्री जीव
तिच्याने फुले संसार सारा. १

काळ्यामातीच्या कुशीत
घामाच्या त्या थेंबांमध्ये
उगवती हिरवीकंच स्वप्ने
सुख घामाच्या गंधामध्ये. २

तांबड्या भू  कणाकणात
शौर्याचीच ज्वाला दिसते
या भूमीच्या रक्षणासाठी
वीर  धारातीर्थी हो पडते. ३

नांगर धरत बा शेतकरी
भुईशी नातं  जोपासतो 
स्वतः उन्हातानात राहून
जगास अन्न तो पिकवतो. ४

ऊन असो  पाऊसधारा
कष्ट कधीच ना थांबती
मातीच्याच कणासाठी
सदा स्वप्ने उरी जागवती. ५

पहिला पाऊस बरसता
माती सुगंधीत हो होते
आईच्या मायेप्रमाणे तो
जना मनाला कवेत घेते. ६

ही भू केवळ माती नाही
ही अस्मिता असे राष्ट्राची
काळ्यातांबड्या मातीत
योजना दडली विकासाची . ७

प्रा. सुरेखा कटारिया चिंचवड पुणे ✍️

Popular posts from this blog

नागपंचमीचा संबंध 'नाग' ह्या सरपटणा-या नागाशी 🐍 नसून, भारतात 'नाग' हे 'टोटेम' असणारे पाच पराक्रमी नाग वंशीय राजे होवून गेले, त्यांच्याशी आहे ..!!*

चारोळीच्या गावात चारोळी क्रमाक- १८३ लोकमान्य टिळक

हातात हात पकडला पाहिजे* कविता