रविवार उपक्रम- आवडती कवितारंग मैत्रीचेमैत्रीचे रंग किती न्यारे

काव्य बहर साहित्य मंच भंडारा
 रविवार उपक्रम- आवडती कविता

रंग मैत्रीचे

मैत्रीचे रंग किती न्यारे
इंद्रधनू सम सुंदर सारे
सुख-दुःखाच्या वाटेवर
साथ देणारे सोबती खरे. १

हास्य रंग गुलाबी गोड
एकमेकाभेटण्या ओढ
विश्वासाचा निळा रंग
जपतो नाते सदा गोड. २

हिरवागार रंग आशेचा 
मैत्रीतून नवे स्वप्न फुले
पिवळा रंग आनंदाचा
उजळे मार्ग स्वानंदाचा. ३

लाल रंग जिव्हाळ्याचा
बंध घट्ट करतो प्रेमाचा
जांभळा तो समजुतीचा
अर्थ उमगवे भावनांचा. ४

मैत्री  रंगांची उधळण
नात्यांची सुंदर गुंफण
रंग मैत्रीचे जपू या सारे
मैत्री म्हणजेच समर्पण. ५
*मैत्री दिनाच्या खूप खूप शुभेच्छा*🌷🥰🌈

प्रा. सुरेखा कटारिया, चिंचवड, पुणे ✍️.

Popular posts from this blog

चारोळीच्या गावात चारोळी क्रमाक- १८३ लोकमान्य टिळक

हातात हात पकडला पाहिजे* कविता

आजचे चिंतन आभाळा एवढं मन