निसर्गकाव्य — हिरवं हिरवं जंगल*

*काव्यबहर साहित्य मंच भंडारा शनिवार उपक्रम*

*निसर्गकाव्य — हिरवं हिरवं जंगल*

     हिरवंगार हिरवं जंगल
चला झाडाच्या सावलीत
   तणामनास करते मंगल
 जणू माऊलीच्या मायेत .१

   वृक्षराजी छान डोलती
वाऱ्यावरती हो अलगद
    हर्ष विभोर  गीत गाती
कोकिळेचा घुमतो नाद.२

    फुलाफुलांत रंग भरती
दरवळे सुगंध चोहीकडे
    ओढ्याचे निर्मळ पाणी
खळखळते उताराकडे.३

    हरिणांची ती धावपळ
मोर पिसारा फुलवतात
   निसर्गची ही सुंदर शाळा
जगवते सुंदर हसवत.४

    हिरवंगार हिरवं जंगल
धरतीमातेचे सुंदर लेणे
    झाडे वाचवू झाडे जपू
निरोगी जगण्या गाऊ गाणे.५

प्रा सुरेखा कटारिया -चिंचवड पुणे✒️

Popular posts from this blog

नागपंचमीचा संबंध 'नाग' ह्या सरपटणा-या नागाशी 🐍 नसून, भारतात 'नाग' हे 'टोटेम' असणारे पाच पराक्रमी नाग वंशीय राजे होवून गेले, त्यांच्याशी आहे ..!!*

चारोळीच्या गावात चारोळी क्रमाक- १८३ लोकमान्य टिळक

हातात हात पकडला पाहिजे* कविता