संत श्री गजानन महाराज समाधी निमित्त विशेष उपक्रम शेगावीचा राणा*श्री गजानन महाराज

*संत श्री गजानन महाराज समाधी निमित्त विशेष उपक्रम शेगावीचा राणा*
श्री गजानन महाराज

शेगावच्या पावन भूमीत
अवतरला शेगाव राणा
भक्तांच्या हृदयामध्येच
वसे श्री गजानन राणा. १

नाही मोह, नाही माया
साधेपणाचा  सदा घाट 
नामस्मरणाच्या गजराने
पावन झाली सारी वाट. २

दीन-दुःखी शरण  येती
त्यांना दिला हो आधार 
कृपादृष्टी पडता क्षणी
दूर होतो दुःखचा भार .३

गण गण गणात बोते
मंत्र घुमे दाहीही दिशा 
महाराज चरणी मिळे
मनाला शांतीची आशा ४

संकट आले जीवनात 
नाम तुझे ओठी यावे 
अंधारलेल्या वाटेवरती
कृपेचे दीप उजळावे . ५

प्रा सुरेखा कटारिया चिंचवड पुणे✍️

Popular posts from this blog

नागपंचमीचा संबंध 'नाग' ह्या सरपटणा-या नागाशी 🐍 नसून, भारतात 'नाग' हे 'टोटेम' असणारे पाच पराक्रमी नाग वंशीय राजे होवून गेले, त्यांच्याशी आहे ..!!*

चारोळीच्या गावात चारोळी क्रमाक- १८३ लोकमान्य टिळक

हातात हात पकडला पाहिजे* कविता