विषय..सोनम वांगचूक
काव्यबहर साहित्य मंच भंडारा आयोजित उपक्रम..
विषय..सोनम वांगचूक
हिमालयाचा दीप : सोनम वांगचुक
हिमशिखरी कुशीत जन्मे
ज्ञानसूर्य एक तो तेजस्वी
सोनम वांगचुक नाव आहे
विचारधन असे ओजस्वी.१
लडाखच्या त्या भूमीमध्ये
नव चैतन्याचे बी अंकुरले
शिक्षणाच्या नव्या वाटेवर
विद्यार्थ्यांचे भाग्य उजळले. २
पुस्तकापुरतेच ज्ञान नको
जीवनाशी सत् नाते जोडू
कृतीने शिक्षण घेत जावू
यश शिखरावरती हो चढू. ३
बर्फस्तूपाची कल्पना देत
पाण्याचा प्रश्न मिटविला
विज्ञानास जोडून मानवता
उर्धगामी दिशा दाखविला. ४
पर्यावरणाचा खंदा रक्षक
निसर्गा सदा सदा जपले
हिमनद्यांचे दुःख जाणून
जगण्या सूत्र शिकविले. ५
सत्यासाठी उभा राहिला
अन्यायाशी हो झुंज दिली
धैर्य शौर्य जिद्द चिकाटीने
ज्योती प्रज्वललीत केली. ६
साधेपणाचा अलंकार लेवून
कार्यातूनी ही मान मिळविला
हिमालयाचा ज्ञानदीप बनुनी
भारतमातेचा गौरव वाढविला. ७
प्रा. सुरेखा कटारिया, चिंचवड, पुणे✍️