मूषक वाहन गणपतीचे*
*काव्यबहर साहित्य मंच भंडारा आयोजित उपक्रम*
*मूषक वाहन गणपतीचे*
मूषक वाहन गणपतीचे
अर्थ तयाचा असे मोठा
लहान रूप मोठा संदेश
आनंदाला नसे हो तोटा.१
चंचल मन मूषकासम
सदोदित धावत राहते
इच्छापूर्तीच्या करण्या
क्षणो क्षणी ते जागते.२
मनावर लगाम बुद्धीचा
ठेवावे सदैवच नियंत्रण
विवेकसंयम सद्विचारां
करा जीवन जनभावन.३
लोभ मोह अन् अहंकार
मनाचीच करिती चोरी
गणराया चरणी ठेवुनी
विकारांवर मात खरी .४
विशाल रूप गणरायाचे
मूषक छोटासा पायाशी
मोठेपण आकारात नसे
नम्र रहा अंतःकरणाशी.५
शक्तीपेक्षा भक्ती मोठी
ठेव सेवाभाव अन् श्रद्धा
मूषक देतो संदेश सुंदर
नम्रता ठेवा सदा सर्वदा.६
गणराया तुझ्या चरणी
मनातील चंचलता ठेवू
बुद्धीविवेक जागृत करू
सद्मार्गाने जीवन जगवू.७
प्रा सुरेखा कटारिया चिंचवड पुणे✒️