विषय- सोड हा रुसवाकाव्यप्रकार -अष्टाक्षरी

काव्य बहर साहित्य मंच, भंडारा. 
आजचा उपक्रम
विषय- सोड हा रुसवा
काव्यप्रकार -अष्टाक्षरी

सोड हा रुसवा सखे
मन व्याकुळ झाले गं
तुझ्या गं अबोल्या ने 
मी सैरभैरा झालो गं. १
 
काय झाहले सांग ना
दाटे का नयनी पाणी?
तुझ्या विना घर सारे
जणू भासती विराणी.२

तुझे रुसवे गोड ते
प्रिय फुगवे वाटती
तुझी ती शांत नजर
मना हुरहुर देती .३

चांदण्यांनी रात्र सजे
फुले गं मोगरा दारी
तुझ्या शिवाय सखे गं
नको ती दुनियादारी. ४

चल सोड कटू क्षणां
प्रीती वीण पुन्हा ओवू
हात हातात दे सखे
राग रुसवे संपवू.५

 प्रेम मनात जपावे
अहंकारा दूर कर
सोड मिटव अबोला
नाते पुन्हा  दृढ कर. ६

ओठांवर हास्य फुले
जग बहरून जाई
जगातला मीच प्रेमी
प्रेम गीत सदा गाई. ७

 प्रा. सुरेखा कटारिया, चिंचवड, पुणे.✍️

Popular posts from this blog

नागपंचमीचा संबंध 'नाग' ह्या सरपटणा-या नागाशी 🐍 नसून, भारतात 'नाग' हे 'टोटेम' असणारे पाच पराक्रमी नाग वंशीय राजे होवून गेले, त्यांच्याशी आहे ..!!*

चारोळीच्या गावात चारोळी क्रमाक- १८३ लोकमान्य टिळक

हातात हात पकडला पाहिजे* कविता