म्हणीवर आधारित काव्य- *अपमानाची पोळी सर्वांग जाळी*

काव्य बहर साहित्य मंच भंडार आयोजित 
म्हणीवर आधारित काव्य- *अपमानाची पोळी सर्वांग जाळी*

अपमानाची पोळी सर्वांगी जाळी
मनाच्या कोपऱ्या वेदना साठली १

शब्दांचे बाण जे हृदयात घुसती
त्याच्या जखमा मनामध्ये राहती.२

गोड बोलावे कुणाला न दुखवावे
माणुसकीचा दीप सदा तेवत ठेवे.३

क्षणिक रागाने नाती न तोडावी
क्षमेची फुले मनामध्ये फुलवावी.४

मान दिला तर मान मिळतो जगती
आनंदाने बहरे माणसाची नाती.५

अपमान करून  मोठे होत नाही 
अबोला पकडून काही साधत नाही.६

शब्द सदा जपून वापरावे ते शस्त्र
योग्य ठिकाणी,वेळी काढा अस्त्र.७

प्रा सुरेखा कटारिया- चिंचवड पुणे✒️

Popular posts from this blog

नागपंचमीचा संबंध 'नाग' ह्या सरपटणा-या नागाशी 🐍 नसून, भारतात 'नाग' हे 'टोटेम' असणारे पाच पराक्रमी नाग वंशीय राजे होवून गेले, त्यांच्याशी आहे ..!!*

चारोळीच्या गावात चारोळी क्रमाक- १८३ लोकमान्य टिळक

हातात हात पकडला पाहिजे* कविता