*काव्य बहर साहित्य मंच आयोजित उपक्रम*माझिया माहेरा जा काव्यप्रकार- सप्तक्षरी
*काव्य बहर साहित्य मंच आयोजित उपक्रम*
माझिया माहेरा जा
काव्यप्रकार- सप्ताक्षरी
माझ्या मनपाखरा
माहेरा जा माझिया
घेऊनी तू आसरा
आठवणींचा माझ्या. १
बालपणाच्या क्षणां
लागे मायेचा रंग
साठे मनात सारे
आठवणीत दंग.२
बाबांच्या सावलीत
क्षण असती न्यारे
आईच्या कुशीतच
मन मोकळे करे. २
दुःखाचे सारे ओझे
ती पाशी सोपवावे
अंगणात तुळस
गंधे दरवळावे. ३
मम् पाऊलखुणां
माय सदा जपती
भिंतीवरच्या स्मृती
हळू मज बोलती. ४
भावंडांच्या गंमती
आठवे पुन्हा पुन्हा
हसू असू डोळ्यांत
न कळे काय गुन्हा. ५
चुलीवरचा वास
आई हातची भाजी
जुन्या त्याआठवणी
मनाला करे ताजी. ६
माझिया माहेरा जा
सांग आईच्या कानी
माते तुझ्या वात्सल्यी
गाते आनंद गाणी. ७
प्रा. सुरेखा कटारिया चिंचवड पुणे