माझी शाळा*

काव्यबहर रविवार उपक्रम आवडती कविता. 

*माझी शाळा*

शाळा म्हणजे ज्ञानमंदिर
संस्कारांचा सुंदर दरबार
अक्षरांच्या पवित्र वाटेवर
उजळतो जीवन  संसार. १

गुरुजनांच्या प्रेमळ छायेत
स्वप्नांना मिळे हो नवे बळ
चुका करत शिकत शिकत
यशाचे मिळते सुंदर फळ.२

मैत्रिणींच्या गोड सहवासा
हास्याचे सदा फुले अंगण
खेळ गाणी कविता गोष्टी
आनंदाचे भरते हो दालन.३

पुस्तकांच्या प्रत्येक पानात
अनुभवांचा असे खजिना
ज्ञान शिस्त प्रामाणिकपणा
घडविते जीवनाचा दागिना. ४

शाळा म्हणजे दुसरच घर
मायेची उब प्रेमाचा जागा    
इथूनच सुरू होतो प्रवास
उज्ज्वल भविष्याची धागा  .५

प्रा.सुरेखा कटारिया,चिंचवड, पुणे ✍️

Popular posts from this blog

चारोळीच्या गावात चारोळी क्रमाक- १८३ लोकमान्य टिळक

हातात हात पकडला पाहिजे* कविता

आजचे चिंतन आभाळा एवढं मन