गेला जरी फुलांचा हंगाम दूर देशी*काव्यप्रकार -सप्तक्षरीकवितेचे नाव - संयम
काव्य बहर साहित्य मंच उपक्रम कवी सुरेश भट यांची ओळ- *गेला जरी फुलांचा हंगाम दूर देशी*
काव्यप्रकार -सप्तक्षरी
कवितेचे नाव - संयम
गेला जरी फुलाचा
हंगाम दूर देशी
गंध दरवळतो
तुझा माझ्या उराशी.१
उन्हामध्ये दुःखाच्या
चांदण्यात सुखाच्या
फूलने कोमेजणे
कर्तुत्वात स्वतःच्या .२
गेला जरी फुलांचा
हंगाम दूर देशी
हर्ष भरे रहावे
मनभावे स्वतःशी.३
कोमेजली ती फुले
आठवांचा तो गंध
साठवण कोपरी
येई सुवास मंद.४
काट्याच्या वाटेवर
चालताना हसावे
प्रेमाच्या पाकळ्यानी
जीवन सजवावे.५
फुलणे कोमेजणे
निसर्गाचाच धर्म
तुका म्हणे संयमी
चालणे हेची कर्म.६
प्रा सुरेखा कटारिया- चिंचवड पुणे✒️