कवितेचे नाव -जीवन सुंदर आहे*
काव्यबहर साहित्य मंच आयोजित रविवारचा
उपक्रम -आवडती कविता
*कवितेचे नाव -जीवन सुंदर आहे*
जीवन खूपच सुंदर आहे
जगण्यावर हो प्रेम करावे।
दुःखाच्या ही वाटांवरती
सदा आशेचे दीप तेववावे॥
सुख-दुःखाचा खेळ सारा,
क्षणाक्षणाला डाव नवा।
हसत हसत चालत राहावू,
हाच जगण्याचा मंत्र हवा॥
वादळे येतातच वाटेमध्ये
धीर कधीही सोडू नका।
काट्यांमध्ये फुले उमलती,
नकाराचा तो सुर फिका
प्रेम, दया, करुणा, सेवा,
यांनी जीवन फुलून जाई।
माणुसकीच्या सुगंधाने,
धरती स्वर्गच होऊन राही॥
निसर्गाचे गीत ऐकू गाऊ,
पहाटेचा घेऊयात श्वास।
प्रत्येक दिवस नवी उमेद,
प्रत्येक क्षणी नवा प्रकाश॥
म्हणून म्हणते पुन्हा पुन्हा,
सदा आनंदाने जगत राहे।
कृतज्ञतेने हसत म्हणावे,
"खरेच, जीवन सुंदर आहे!"
प्रा सुरेखा कटारिया चिंचवड पुणे✍️