तसा न चंद्र राहिला*

*काव्यबहर साहित्य आयोजित उपक्रम*

*तसा न चंद्र राहिला*

तसा तो न चंद्र राहिला,
तशीच ती चांदणी कुठे?
परिवर्तनाच्या वळणावर
प्रत्येक जण स्वार्थ गाठे. १

नभ अजून ही तेच आहे,
ताऱ्यांची तीच असे रांग
का नात्याची ओल सुखली
मुके झाले भावनांचे रंग.२

रातराणीचा गंध विरला
शांतशीतल वारा थांबला
आठवणीं धुसूर झाल्या
आपलेपणा कुठे गेला. ३

बदलला काळ,माणसं
तसे न ते चांदणे राहिले
स्वार्थ नगरीत हरवली
नात्यां नात्यातील मुले. ४

तरी ही आशेचा  किरण
मनात अजून तो उगवतो
नवाचंद्र पुन्हा नभी यावा
जीव आनंदानेच भारतो. ५

 प्रा. सुरेखा कटारिया, चिंचवड, पुणे✍️

Popular posts from this blog

नागपंचमीचा संबंध 'नाग' ह्या सरपटणा-या नागाशी 🐍 नसून, भारतात 'नाग' हे 'टोटेम' असणारे पाच पराक्रमी नाग वंशीय राजे होवून गेले, त्यांच्याशी आहे ..!!*

चारोळीच्या गावात चारोळी क्रमाक- १८३ लोकमान्य टिळक

हातात हात पकडला पाहिजे* कविता