स्पर्धा 'स्व' शोधाची...

स्पर्धा 'स्व' शोधाची...

स्पर्धा नाही कुणाशीच, 
   स्पर्धा माझ्याशीच होती,
ज्ञान,संस्कार,कर्तव्याची
   अंतरीची दीपज्योत होती.

गुरु भेटले वाटचालीत
    नवी दिशा आशा देणारे
विश्वासाने हात धरुनी, 
    स्वप्नांना मम् पंख देणारे.

शारदेची दृष्टी लाभली
    गुणांची केली ओळख,
अभ्यंकर गुरुनी दिली
    विचार पालवी सखोल.

प्राचार्य यादव म्हणाले, 
   "वाचन तुम्ही थांबवू नका,"
ज्ञान विहिरीत पाणी भरा     
   संस्कार दीप विझूव नका.

प्रकाशच्या विश्वासाने
    ते धैर्य मनामध्ये जागे,
असूया टोमणे संकटे,     
  निर्धारापुढे झाली फिके.

कथाकविता व्याख्यानाने
      विद्यार्थी झाले आपुले,
शब्दामधुनी संस्कारांचे
     मोगरे सुवासिक फुलले   .

पुरस्कारांनी वाढविला,     
     आत्मविश्वासाचा मान,
सेवेमध्येच शोधला मी,     
    जीवनाचा  स्वाभिमान.

प्राचार्य असतो कप्तान,    
    विद्यालयाच्या नौकेचे,
दूरदृष्टी प्रेम प्रेरणेनेच, 
    घडवी भविष्य देशाचे.

प्रा सुरेखा कटारिया चिंचवड पुणे✍️

Popular posts from this blog

नागपंचमीचा संबंध 'नाग' ह्या सरपटणा-या नागाशी 🐍 नसून, भारतात 'नाग' हे 'टोटेम' असणारे पाच पराक्रमी नाग वंशीय राजे होवून गेले, त्यांच्याशी आहे ..!!*

चारोळीच्या गावात चारोळी क्रमाक- १८३ लोकमान्य टिळक

हातात हात पकडला पाहिजे* कविता