आदरणीय डॉ. संजयजी चोरडिया यांना अवतरण दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!* 🌹

🌹 *आदरणीय डॉ. संजयजी चोरडिया यांना अवतरण दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!* 🌹

सूर्यदत्ता एज्युकेशन ट्रस्टचे संस्थापक, दूरदर्शी शिक्षणतज्ज्ञ आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व आदरणीय डॉ. संजयजी चोरडिया यांना अवतरण दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

माझ्या चिंतनानुसार पिकलेले फळ तीन गुणांनी ओळखले जाते—ते मृदू असते, गोड लागते आणि त्याचा रंग परिपक्वतेची साक्ष देतो. त्याचप्रमाणे परिपक्व व्यक्तिमत्त्वाची ओळख त्याच्या नम्रतेत, वाणीतील गोडव्यात आणि अढळ आत्मविश्वासात दडलेली असते. डॉ. संजयजी चोरडिया यांचे व्यक्तिमत्त्व हे या तिन्ही गुणांचे जिवंत उदाहरण आहे.

त्यांचे हात आकाशाला स्पर्श करतात, पण पाय मात्र आजही जमिनीवर घट्ट रोवलेले आहेत. संघर्षातून स्वतःचे अस्तित्व निर्माण करत त्यांनी सूर्यदत्ता एज्युकेशन ट्रस्ट उभारला आणि सर्वसामान्य विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाची असंख्य दारे खुली केली. शिक्षणाला सामाजिक परिवर्तनाचे प्रभावी माध्यम बनविण्याचे त्यांचे कार्य प्रेरणादायी आहे.

महात्मा ज्योतिराव फुले यांनी जसे सावित्रीबाईंसोबत समाजपरिवर्तनाची ज्योत प्रज्वलित केली, त्याचप्रमाणे संजयजींच्या कार्यप्रवासात त्यांच्या सहचारिणी सौ. सुषमाजी चोरडिया यांचीही मोलाची साथ लाभली. या दाम्पत्याच्या जगण्यात साधेपणा, माणुसकी, परस्पर सन्मान आणि समाजाप्रती असलेली बांधिलकी प्रकर्षाने जाणवते. व्यक्तिमत्त्वातील रुबाब हा विकत मिळत नसतो; तो आपल्या आचरणातून आणि कार्यातून सिद्ध करावा लागतो, याचे ते उत्तम उदाहरण आहेत.

पुस्तकी ज्ञानापेक्षा अनुभवाचे ज्ञान अधिक समृद्ध असते. अनुभव आणि अनुभूती यांच्या संगमातूनच डॉ. संजयजी चोरडिया यांचे व्यक्तिमत्त्व अधिक उंचावत गेले आहे.

«"काही माणसे श्रीमंतीला सलाम करतात, काही माणसे गरिबाला गुलाम करतात; पण जी माणसे माणुसकीला प्रणाम करतात, तीच माणसे जीवनाचा खरा सन्मान करतात."»

हा विचार त्यांच्या जीवनातून प्रत्ययास येतो. पाठ फिरवून जाणाऱ्यांपेक्षा संकटात पाठीशी उभे राहणाऱ्यांना कधीही विसरू नये, हे त्यांचे जीवनतत्त्व प्रत्येकाला प्रेरणा देणारे आहे.

याच दूरदृष्टी, प्रामाणिक परिश्रम आणि सकारात्मक विचारसरणीमुळे सूर्यदत्ता संस्थेने अल्पावधीत राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय भरारी घेतली आहे.

त्यांच्या सहवासात एक गोष्ट सातत्याने जाणवते—

"जीवन ही एक यात्रा आहे. रडत जगलात तर ती खूप लांब वाटते; हसत जगलात तर ती क्षणात संपल्यासारखी वाटते. कसे जगायचे, हे मात्र आपणच ठरवायचे असते."

अशा या प्रेरणादायी, शिक्षणमहर्षी, समाजभिमुख आणि उच्चविभूषित डॉ. संजयजी चोरडिया यांना उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि अखंड कार्यसिद्धीच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

🎉 अवतरण दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 🌹🙏

– शुभेच्छुक
प्रा. सुरेखा कटारिया – प्रा. प्रकाश कटारिया
राष्ट्रीय उपाध्यक्ष, श्री ऑल इंडिया जैन कॉन्फरन्स, नवी दिल्ली
संस्थापक अध्यक्षा – स्वानंद महिला संस्था

Popular posts from this blog

हातात हात पकडला पाहिजे* कविता

चला चारोळीच्या गावा चारोळी क्रमांक-१८८. श्रावण

नाट्यछटा काय म्हणावं या मोठ्यांना...!