विषय :- तारका नभातल्या (श्रीकाव्य प्रकार)*

*काव्यबहर साहित्य मंच, भंडारा.*
*दिनांक :- २७.०६.२०२६ (शनिवार)*
*उपक्रम क्रमांक :- १३०१ (निसर्ग काव्य)*
*विषय :- तारका नभातल्या (श्रीकाव्य प्रकार)*

*तारका नभातल्या*

तारका नभातल्या
चमचमे
चंद्राला साथ देत
आकाशी रमे. १

पाऊस धुवाधार
चोहीकडे
कुनबी पेरी धनधान्य 
आनंदाने बागडे.२

उन्हामध्ये राबतो
शेतकरीदादा
सदा खाऊन जातो
व्यापारी मलिदा. ३

प्राजक्तासम फुलवा
सुखीसंसार
शेतकरीदादा बांधावे तोरण
सौख्य अपरंपार. ४

भरणपोषण करतो
जपतो 
तूच सर्व नात्यांना
हर्षभरे  गातो. ५

प्रा सुरेखा कटारिया चिंचवड पुणे✍️

Popular posts from this blog

नागपंचमीचा संबंध 'नाग' ह्या सरपटणा-या नागाशी 🐍 नसून, भारतात 'नाग' हे 'टोटेम' असणारे पाच पराक्रमी नाग वंशीय राजे होवून गेले, त्यांच्याशी आहे ..!!*

चारोळीच्या गावात चारोळी क्रमाक- १८३ लोकमान्य टिळक

हातात हात पकडला पाहिजे* कविता