विषय:-- दिस जातील दिस येतील*

*काव्य बहर साहित्य मंच भंडारा आयोजित उपक्रम*
*कवी सुधीर मोघे यांची शब्द ओळ*
*विषय:-- दिस जातील दिस येतील*
काव्यप्रकार सप्ताक्षरी
सुखा नंतर दुःख
दरी सुखदुःखाची
दु:खा नंतर सुख
आस रे जगण्याची. १

मम् दिस जातील
दुःख माझं सरल
पुन्हा तिच येईल
हर्ष  गीत गाईल. २

दिवा वंश मुलगा
नंदादीप मुलगी
सासर नि माहेर
करे सदा सलगी. ३

मी तुझाच तू माझी
यशासाठी हो राजी
कर्म करत रहा
थोडी जिद्द ती साजी.४

येई ढग भरून
काळ होई आकाश
माती म्हणे सूर्याला
थोडा देरे प्रकाश. ५

प्रा सुरेखा कटारिया चिंचवड पुणे✍️

Popular posts from this blog

नागपंचमीचा संबंध 'नाग' ह्या सरपटणा-या नागाशी 🐍 नसून, भारतात 'नाग' हे 'टोटेम' असणारे पाच पराक्रमी नाग वंशीय राजे होवून गेले, त्यांच्याशी आहे ..!!*

चारोळीच्या गावात चारोळी क्रमाक- १८३ लोकमान्य टिळक

हातात हात पकडला पाहिजे* कविता