विषय. :-- *तुझ्या विरहात.....*

काव्य बहर साहित्य मंच भंडारा आयोजित शुक्रवार दिनांक १९-६-२०२६ चा दैनिक उपक्रम क्रमांक १२९३
विषय. :--  *तुझ्या विरहात.....*

तुझ्या विरहात
सलते ग काही
पाणी नयनात
या मनाच्या ठाई. १

उरी माझ्या हा
दाटतो ग पान्हा
कुठे दूर गेला
मम् कृष्ण कान्हा. २

तुझ्याविना बाळा
उदास भकास
वाटे क्षणोक्षणी
होतो तुझा भास. ३

काळजाचा ठोका
दर क्षणी वाढतो
तुला भेटण्यास
जीव व्याकुळतो. ४

विरहात तुझ्या
वाटेवर डोळे
तुझ्या वीना कसे
 पूर्वू आनंद सोहळे. ५

प्रा सुरेखा कटारिया चिंचवड पुणे✍️

Popular posts from this blog

नागपंचमीचा संबंध 'नाग' ह्या सरपटणा-या नागाशी 🐍 नसून, भारतात 'नाग' हे 'टोटेम' असणारे पाच पराक्रमी नाग वंशीय राजे होवून गेले, त्यांच्याशी आहे ..!!*

चारोळीच्या गावात चारोळी क्रमाक- १८३ लोकमान्य टिळक

हातात हात पकडला पाहिजे* कविता