विषय नभात स्पर्धा मेघांची काव्य प्रकार अष्टाक्षरी
काव्यबहर साहित्य समूह आयोजित उपक्रम दिनांक ६/६/२६
विषय नभात स्पर्धा मेघांची
काव्य प्रकार अष्टाक्षरी
कडकडाडता हो वीज
स्पर्धा नभात मेघांची
जोड जमे तुझी माझी
मोर लांडोर दोघांची. १
थुई थुई नाचे मोर
रूप छान मनोहर
जलधारा बरसती
चाले सृष्टीचा जागर. २
पृथ्वी आकाश मिलन
जाते मोहरूनी धरा
प्रसवता हो धरणी
मेघ मल्हाराला स्मरा. ३
खग आकाशी फिरती
जल जीवन अर्पिती
जणू आवतरे जगी
हर्ष भरे ब्रहस्पती. ४
वृक्षवेली सवे खेळे
सदा खट्याळ तो वारा
टप त्यावर पडती
थंड थंड थंड गारा५
प्रा सुरेखा कटारिया चिंचवड पुणे✒️