म्हणी वरून काव्य अंगावरचे लेणे जन्मभर देणे

काव्य बहर साहित्य मंच 
म्हणी वरून काव्य 
अंगावरचे लेणे जन्मभर देणे 

    अंगावरचे लेणे जन्मभर देणे
    अंथरूण पाहून पाय पसरणे. १

कर्ज काढूनीया दागिने करणे   
 चक्रवाढ व्याज भरून मरणे. २

    मरता सारे येथेच ठेवून जाणे
   जगताना हाय हाय हाय करणे.३

सदासदगुणांच्या दागिन्याचे लेणे   
 गात रहे आनंदाचे जीवन गाणे.४

   नको तो मोठेपणा प्रतिष्ठा खोटी 
    जगण्यासाठी सत्याची कसोटी.५

सोने चांदीत मन तिचे अडकले
किमती पाहून रायाच तडकले.६

    सोन्याचांदी भाव तेजीनं वाढले
   युद्धाच्या परिणामनं जगा वेढले.७

प्रा सुरेखा कटारिया चिंचवड पुणे✒️

Popular posts from this blog

चारोळीच्या गावात चारोळी क्रमाक- १८३ लोकमान्य टिळक

हातात हात पकडला पाहिजे* कविता

आजचे चिंतन आभाळा एवढं मन