काव्यबहर साहित्य मंच आयोजित उपक्रम**विषय :--चित्रकाव्य*

*काव्यबहर साहित्य मंच आयोजित उपक्रम*
*विषय :--चित्रकाव्य*

घर हे सुंदर  कौलारू छान
ठेवत सह जीवनाचे भान
आजी आजोबा नात नातू
ठेवे एकमेकाचा आदरमान. १

 करोडपतीच्या घरामध्ये  
नसे असे सुख  समाधान
घर जरी असले हो लहान
आनंदीचे ठेवतात ते भाण. २

प्रेमानं विणली घट्ट नाती
नसे अभिमान नसे हो  गर्व
आनंदाने बसतात प्रभाती
सुतावरून गाठतात स्वर्ग. ३

नातीगोती  सांभाळताना
सदा हवी मनाची श्रीमंती
जीवन समाधाने जगण्या
करूया आनंदाची भ्रमंती. ४

चेहऱ्यावरील हसू असे
हाच खरा तो रे दागिना
आणि समाधान हे सुख
संत वर्ततात सत्यविधाना. ५

प्रा सुरेखा कटारिया चिंचवड पुणे✒️