विषय -बदललेली जीवनशैलीशीर्षक- भजन व भोजन
काव्यबहर साहित्य मंच भंडारा
दि २६/०५/२०२६ मंगळवार
उपक्रम क्र १२६९
विषय -बदललेली जीवनशैली
शीर्षक- भजन व भोजन
बदलन हा निसर्गाचा नियम
सर्वजण तोच श्वास घेतात
सुखात हसतो दुःखात रडतो
बदललेले जीवन स्वीकारत.१
पूर्वी एकमेक संवाद साधत
आता फरक फक्त एवढाच
दूरभ्रमंतीचे करतो स्वागत
मार्ग बदलला संवादाचाच. २
आता अन्न खातो तेव्हा ही
खात होतो गाणे गात होतो
भक्तीगीत,आज पॉपसंगीत
फरक दोन्हीतला जाणतो. ३
पूर्वी आई वडील मुलांना
खास सदा वेळ देत होते
आता पाळणाघर निघाले
जोडी वृद्धाश्रमाशी नाते. ४
संस्कार संस्कृतीचं जतन
मेळ घालावा दोनपिढ्यांनी
बदललेल्या जीवनशैलीत
करा भजन भोजन मिळूनी. ५
प्रा सुरेखा कटारिया चिंचवड पुणे✒️