कवयत्री इंदिरा संत यांचीशब्दओळविषय-डोळ्यामधुनी थेब सुखाचे
🙏🏻काव्य बहर साहित्य मंच,
भंडारा आयोजित,
उपक्रम,
२५/५/२६
सोमवार,
कवयत्री इंदिरा संत यांची
शब्दओळ
विषय-डोळ्यामधुनी थेब
सुखाचे
एकची नयनीआसू
दुसऱ्या नयनी हसू
सुखदुःखाचे मिलन
अश्रू येई चटकन. १
आई बाबांना सोडून
सासू सासऱ्या जोडून
सासरची धरे वाट
समर्पणाचा हा घाट. २
प्रेममाहेर सोडताना
सहजीवनी जगताना
शारीरिक सुखासाठी
केल्या या वाटाघाटी. ३
सासरी लवकर उठते
उशिरापर्यंत जागते
येतो आईचा आठव
आठवणीचा हो साठव. ४
डोळ्यात थेंब सुखाचा
क्षण हर्षी जीवनाचा
पुलंकीत होई गात्र
स्मृतित जगते रात्र .५
जेव्हा तो होतो तिचा
समागम विश्वासाचा
माहेराहून हो सासरी
जीवनी वाजे बासरी. ६
नात्यांचे उबदार धागे
जीवनी आनंद सांगे
डोळ्यात थेंब सुखाचे
दुःख ते नको फुकाचे. ७
प्रा सुरेखा कटारिया चिंचवड पुणे✒️