आजचा उपक्रम**निसर्ग काव्य**ये रे पावसा*
*आजचा उपक्रम*
*निसर्ग काव्य*
*ये रे पावसा*
*शीर्षक:- धरा होई शांत
येरे ये पावसा म्हणता
काळे काळे ढग हसता. १
दिसे इंद्रधनु कमान
उधळे सप्तरंग छान. २
रंग सावळा भारे मेळा
वाऱ्याचा तो खेळ वेगळा. ३
करे रुणझुण रुणझुण
थेंबाच्याच पायी पैंजण. ४
अलगद अमृतधार
भूमातेचा हसला स्वर. ५
चैतन्याचे रंग उधळे
स्वप्न उद्याचे हिरवळे. ६
पावसाचेच येणे होता
आनंदाच्या लहरी उठता. ७
तुझ्यात आम्ही भिजतो
गंध मातीचा आम्ही घेतो. ८
शांत होई धरा रापलेली
हर्षे पशु पक्षी वृक्षवेली. ९
प्रा सुरेखा कटारिया चिंचवड पुणे✒️