विषय:- आगीशिवाय धूर दिसत नाही.* द्विपदी काव्यरचना*(अर्थ:- एखादी गोष्ट घडल्याशिवाय त्याचे परिणाम दिसत नाही)*

*उपक्रम क्र. १२६४*
*गुरुवार दिनांक :-२१/०५/२०२६*
 मराठी म्हणीनुसार काव्य

*विषय:-  आगीशिवाय धूर दिसत नाही.* द्विपदी काव्यरचना
*(अर्थ:- एखादी गोष्ट घडल्याशिवाय त्याचे परिणाम  दिसत नाही)*

ज्याचं जळतं त्यालाच कळतं
वास्तव आहे त्यालाच छळतं.१

अग्नी शिवाय धूर दिसत नाही
काही काही सदा घडत जाई.२

माणसानं स्वतःस सिद्ध करावं
आरसा दाखवत जगानं वरावं. ३

आत्मविश्वासाने स्वतः वागावं
शंका घेण्यास इतरांन वरावं. ४

ठेवायचं पाऊल  पुढे ठेवावं
आनंदाने जीवन गाणे गावावं. ५

बनवायच्या आठवणी बनवं
तू तुझाच पुरुषार्थ जागवं. ६

राहायचं तर मूल बनवून राहा
निरागस जीवन जगून पहा. ७

प्रा सुरेखा कटारिया चिंचवड पुणे✒️

Popular posts from this blog

नागपंचमीचा संबंध 'नाग' ह्या सरपटणा-या नागाशी 🐍 नसून, भारतात 'नाग' हे 'टोटेम' असणारे पाच पराक्रमी नाग वंशीय राजे होवून गेले, त्यांच्याशी आहे ..!!*

चारोळीच्या गावात चारोळी क्रमाक- १८३ लोकमान्य टिळक

हातात हात पकडला पाहिजे* कविता