विषय : महत्त्व अधिकमासाचे* *शीर्षक : राष्ट्रप्रेम जपूया*

*काव्यबहर साहित्य मंच आयोजित उपक्रम सामा . काव्यलेखन* 
 *दि* *.१९/५/२६* 
 *विषय :   महत्त्व अधिकमासाचे* 
 *शीर्षक : राष्ट्रप्रेम जपूया* 

मास आलाआला आधिक
    थाट जावईबापू मुलींचा
जावया हर्ष तो सर्वाधिक
      क्षणची छान आनंदाचा. १

लेकीच्या हो सुखासाठीच
   माय नांदत असे सासरी
गिटून सारा सासरवास 
   धोंड्याची स्वागत तयारी. २

सौरवर्ष अन् चंद्रवर्ष
    आकरा दिस फरक राखे
तीन वर्षाचीच प्रतीक्षा
    धोंडा अधिकमास चाखे. ३

पुण्यार्जन करण्या जप
      सतपात्री देऊनी दान
करा दानधर्मासवे तप   
     ठेवा अधिकमासी भान. ४

धोंडे अनारसे मैसूर पाक
   तेहतिस नग ताटा घालुनी
परंपरेचा सदा मान राख
   तांबे  सोन्याचे दान देऊनी. ५

युद्धाचा होत आहे भडका
      मोदीजींनी दिला तडका
सोने खरेदी करू नका
    राष्ट्र प्रेमाची आब राखा. ६

सर्वांनी करावे हो सहाय्य
    सोने न देताच जपू सदा सोन्यासारखीच माणसे
    राष्ट्रप्रेम जपू सदा कदा. ७

प्रा सुरेखा कटारिया चिंचवड पुणे✒️

Popular posts from this blog

नागपंचमीचा संबंध 'नाग' ह्या सरपटणा-या नागाशी 🐍 नसून, भारतात 'नाग' हे 'टोटेम' असणारे पाच पराक्रमी नाग वंशीय राजे होवून गेले, त्यांच्याशी आहे ..!!*

चारोळीच्या गावात चारोळी क्रमाक- १८३ लोकमान्य टिळक

हातात हात पकडला पाहिजे* कविता