आजचे कवी. *दत्ता पाटील*शब्द ओळ. *नाम तुझे घेता देवा*

काव्य बहर साहित्य मंच भंडारा आयोजित सोमवार दिनांक १८-५-२०२६ 
उपक्रम   *शब्द ओळ कवीची भावना आपल्या मनीची*
आजचे कवी.  *दत्ता पाटील*
शब्द ओळ. *नाम तुझे घेता देवा*

नाम तुझे घेता देवा
दूर होते सदा भ्रांती
आणि मिळे मनशांती
जीवनात येई क्रांती. १

तूच माझा असे श्वास
तूच माझी असे आस
राग द्वेष होई -हास 
मन शांतीचा हो ध्यास.२

लावे चंदनाचा टिळा
भक्ती गीत गाई गळा
आनंदाचा तो सोहळा
पाही हेच देही डोळा.३

सदा असावी तुझीर
 कृपा दृष्टी आम्हावर
देव दिसे माणसात
सदा भूतदया जाणत. ४

चरा चरात दिसे तू
निर्गुणाची सगुन तू
करता करविता तू
देहभान हरवे तू..५

प्रा सुरेखा कटारिया चिंचवड पुणे✒️

Popular posts from this blog

हातात हात पकडला पाहिजे* कविता

नाट्यछटा काय म्हणावं या मोठ्यांना...!

चला चारोळीच्या गावा चारोळी क्रमांक-१८८. श्रावण