भक्ति गीत कार्यशाळाविषय : भोळ्या शंकरा

काव्यबहर साहित्यमंच भंडारा
08/05/2026
भक्ति गीत कार्यशाळा

विषय : भोळ्या शंकरा

 भोळ्या शंकरा मी पुजिले
 पती तुझंसम मम् मिळाले.. धृ. 

केली शिवाची पूजा,मनोभावे
शंभू महादेवा जीवनी स्मरावे
मम् अहंभाव सारे गळून गेले    
सारे भोळ्या शंकराने दिधले.. १

सदा जाई मी शिवपूजनाशी
गर्दीतील दर्दी नमन ईश्वराशी
भोळ्याशंकरा भक्ती अर्पले
तुझ्यामुळेच सर्व ते मिळाले. २

श्रावणात  नेसून पांढरी साडी
दर सोमवारी शिव मुठ सोडी
सदा तुझे आशीर्वाद मिळाले
आमचे जीवन सुंदर जाहले. ३

प्रा सुरेखा कटारिया चिंचवड पुणे✒️

Popular posts from this blog

नागपंचमीचा संबंध 'नाग' ह्या सरपटणा-या नागाशी 🐍 नसून, भारतात 'नाग' हे 'टोटेम' असणारे पाच पराक्रमी नाग वंशीय राजे होवून गेले, त्यांच्याशी आहे ..!!*

चारोळीच्या गावात चारोळी क्रमाक- १८३ लोकमान्य टिळक

हातात हात पकडला पाहिजे* कविता