अभंग*विषय:-- शेगावीचा राणा

*काव्य बहर साहित्य मंच भंडारा*
            *आयोजित*
**गुरुवारचा उपक्रम*
अभंग
*विषय:-- शेगावीचा राणा

जय जय गजानन, ध्यास तुझ्याच नामाचा
सांगे भिऊ नको तुझ्या,पाठी राणा शेगावीचा!! धृ!! 

भक्ती करता तुझी,मन होते हो प्रसन्न
बांधे पुण्यकर्म बंध,सदा  होवूनिया लिन. 
देई समाधान मनी ,राणा असे शेगावीचा ll१ll. 

कृपादृष्टी मजवरी,सदा रहावी तुझीच. 
गण गणात बोते ,सदा मनी माझ्याच. 
श्रद्धा सबुरी ठेवा, सांगे राणा  शेगावीचा ll२ll

ठेवूनिया माथा,मनोभावे जोडू हाता. 
माघ सप्तमी प्रगटे,गीत तुझे सदा गाता. 
योगी गजानन कृपा, ठेवी राणा शेगावचा ll३ll. 

प्रा.सुरेखा कटारिया चिंचवड पुणे✒️

Popular posts from this blog

चारोळीच्या गावात चारोळी क्रमाक- १८३ लोकमान्य टिळक

हातात हात पकडला पाहिजे* कविता

आजचे चिंतन आभाळा एवढं मन