अभंगविषय-विठू माऊली.

काव्यबहर साहित्य मंच भंडारा
अभंग
विषय-विठू माऊली. 

विठू माऊली पाहू, आम्ही दीन दुबळ्यात
आस तुला भेटण्याची ,तुझा वास सत्कर्मात... धृ

शेतामधी माझ्या मुळा,गाजर  असे हो माठ
तरारली छान शेती,आळसाचा  नसे थाट
तुझे दर्शन होईल, उभ्या हिरव्या शेतात ll१ll

मन शांत करण्यास,नाम तुझे रे पावन
घेता विठ्ठलाचे नाव, मनी उमडे सावन
सारे सारे होते छान, असे विठूच्या नामात ll२ll

दोन्ही हात जणू टाळ,गळा तुळशीची माळ
लागे भेटण्याची आस,जोडू तुझी माझी नाळ
सारे मलाच मिळते, विठू तुला भेटण्यात ll३ll

प्रा सुरेखा कटारिया चिंचवड पुणे✒️

Popular posts from this blog

हातात हात पकडला पाहिजे* कविता

नाट्यछटा काय म्हणावं या मोठ्यांना...!

चला चारोळीच्या गावा चारोळी क्रमांक-१८८. श्रावण