विषय :- तोच चंद्रमा नभात

*काव्यबहर साहित्य मंच, भंडारा.*
*दिनांक :- २७.०४.२०२६ (सोमवार)*
*उपक्रम क्रमांक :- १२४० 
*शब्दकवींचे :- कवयित्री शांता शेळके यांची शब्द ओळ*
*विषय :- तोच चंद्रमा नभात 

दिसे चंद्रमा नभात
लया जाता  प्रभात. १

रातराणी गंधाळते 
रजनीला फुलवते. २

चांदण्याच्या सहवासी
चंद्रा सवे आहे राशी. ३

चंद्र चांदण्या पाहता
गाणे प्रीतीचेच गाता. ४

गंध पहिल्या प्रीतीचा
ठाव घेई हो मनाचा. ५

प्रेम जडे तुझ्यावर
तूच दिसे सभोवर. ६

नव्या स्वप्ना बिया पेरू
 प्रेम संजवनी भारु. ७

साधनेची स्फूर्ती प्रेम
सारे प्रेमातच  क्षेम. ८

राग द्वेषाला सोडूया
जग प्रेमाने बांधूया. ९

प्रा.सुरेखा कटारिया चिंचवड पुणे✒️

Popular posts from this blog

आजचे चिंतन आभाळा एवढं मन

हातात हात पकडला पाहिजे* कविता

नाट्यछटा काय म्हणावं या मोठ्यांना...!