विषय:-गुढी उभारू सौख्याची*
*काव्य बहर साहित्य मंच भंडारा*
*आयोजित*
*गुरुवारचा विशेष उपक्रम*
************************
💐💐💐💐💐💐💐💐
*विषय:-गुढी उभारू सौख्याची*
💐💐💐💐💐💐💐💐
*गुरूवार दिनांक :-१९/०३/२०२६*
सण आनंदाचा हो आला
चैत्रमासी उल्हास झाला. १
गुढी उभारूया सौख्याची
सकारात्मक ऊर्जा सर्वांची. २
नववर्षाचे करू स्वागत
मने संभाळू या अंतर्गत. ३
राग द्वेष मत्सर जळो
सुजनता सदा मिळो. ४
करू उर्जित संकल्प
मनी हो नसे विकल्प. ५
बांधू पुण्य कर्माचा बंध
जीवनी आनंदाचा गंध. ६
नव वर्षा करू स्वागत
हा हिंदू धर्माचे आगत. ७
गुढी उभारूया प्रेमाची
आशा नव्या संकल्पची. ८
जपू वारसा संस्कृतीचा
सण हा गुढीपाडव्याचा. ९
प्रा सुरेखा कटारिया चिंचवड पुणे✒️